प्रकाश नारायण संत यांचा 'पंखा' हा तिसरा कथासंग्रह.लंपन या निसर्गात रमलेल्या, चराचराविषयी कुतूहल असलेल्या, संगीत, चित्रकला, खेळ आदी गोष्टींची विलक्षण ओढ असलेल्या मित्र-मैत्रिणींत हरवूनही स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव करून देणाऱ्या, कल्पक, शोधक वृत्तीच्या संवेदनाशील मुलाच्या भावजीवनाच्या चित्रणाला 'वनवास' मध्ये सुरुवात होते आणि 'शारदा संगीत' आणि 'पंखा' या संग्रहांतून ते विकसित होत राहते. (पुढे ते 'झुंबर' या मौज प्रकाशन गृहाकडून लवकरच प्रकाशित होणाऱ्या चवथ्या संग्रहात परिपूर्णपणे चित्रित होते.)अशा चार संग्रहांतून उघडत जाणाऱ्या लंपनच्या विशिष्ट पर्वातील भावविश्वासमवेत, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर वसलेल्या एका सुंदर लहानशा गावाचे - तिथल्या निसर्गाचे, माणसांचे, प्राण्यांचे व्यापक दर्शन घडते. तिथल्या प्रादेशिक वातावरणाला वेढून राहिलेला 'कानडीची चाल लागलेला मराठीचा गोडवा' मनात भरून राहतो.'वनवास' आणि 'शारदा संगीत' या प्रकाश नारायण संत यांच्या आधीच्या संग्रहांना वाचकांचा, साक्षेपी समीक्षकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला. आजच्या आघाडीच्या मराठी लेखकांत त्यांना मानाचे स्थान मिळाले.'पंखा' या संग्रहालाही चढत्या श्रेणीचे श्रेय लाभेल असा भरवसा वाटतो.
please login to review product
no review added