महानामा' संतपरंपरा,संतसाहित्य म्हटले कि अध्यात्म,धर्म, परमेश्वर या गोष्टी समोर येतात. पण संत साहित्यात सांगितलेले तत्कालीन सामाजिक विचार लक्षात घेतले जात नाहीत.महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत क्रांती घडवणारे संत नामदेव यांचा सामाजिक दृष्टीकोन विशाल होता.त्यामुळेच त्यांनी तामिळनाडू ते पंजाब अशी भ्रमंती करून ,मराठी राज्याबाहेरही संत परंपरा रुजवली. उत्तर भारतात त्यांनी सांस्कृतिक परिवर्तन घडविले,सामाजिक विचारांचा मागोवा सचिन परब व श्रीरंग गायकवाडयांनी 'महानामा' यात घेतला आहे. नामदेव कोण होते, त्यांचे विविध प्रांतातील कार्य,मराठीतील आद्य लकवी,महाराष्ट्र धर्माचे प्रणेते अशी त्यांची ओळख कशी झाली,त्याची माहिती यातील विविध लेखांमधून मिळते. जाती-धर्म,प्रांत,सीमावादात अडकलेल्या भारतीयांसाठी संत नामदेव यांचे कार्य आजही महत्वपूर्ण ठरते
please login to review product
no review added