सध्या मोठ्या शहरात जमिनीच्या किमती आकाशाला जाऊन भिडल्या आहेत. म्हणूनच आकाशाची उंची गाठू पाहणा-या इमारती मोठ्या शहरात होऊ लागल्या आहेत. ‘बंगला’ हे एक अजूनही ‘स्वप्न’ आहे. ओनरशिप फ्लॅट हे मात्र ‘वास्तव’ आहे. आपल्या बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये बागेची हौस कशी करावी, याची विशेष कल्पना कुणाला नसते. म्हणूनच अशा रसिक लोकांसाठी घरात, बाल्कनीत, टेरेसवर कोणती झाडं, कशी लावावीत, त्यांची कोणती काळजी घेऊन ती कशी फुलवावीत-जोपासावीत, यासाठी हे मार्गदर्शन. बाग, ती घरातील असो की, घराबाहेरील असो, ती जोपासण्यात-फुलविण्यात एक आगळा-वेगळा आनंद असतो. आपण लावलेल्या झाडांना फुलं-फळं आलेली पाहिल्यावर अनेक प्रकारचे मानसिक ताणतणावसुद्धा कमी होतील. तसेच, झाडांची निगा करताना शारीरिक श्रम झाले की, प्रकृतीही सुधारेल. जागा लहान असो, की मोठी असो, तिथं बाग करा. जागा नसेल, तर कुंडीत, खोक्यात झाडं लावा. शास्त्रोक्त पद्धतीनं ती छान फुलवा. निसर्गाचा अमर्याद आनंद लुटा... आनंदी व निरोगी व्हा...
please login to review product
no review added