हीही एक चावटीच - भागानगरीच्या परिसरातील काही उद्ध्वस्त अवशेषांतून संशोधन करीत असता आमच्या हाती एक अत्यंत जीर्ण हस्तलिखित सापडले. विशेष अवलोकनानंतर असे ध्यानी आले, की त्या ग्रंथाचे नाव ‘आनंदध्वजद्वादशी’ असावे आणि त्यात कुणा आनंदध्वजाच्या उचापतीच्या बारा कथा असाव्या. अतिशय मेहनत घेऊन आम्ही त्या कथा लावीत आलो व जसजशा त्या लागल्या, तशा त्या मराठी वाचकांच्या सेवेस सादर करीत आलो.
please login to review product
no review added