वि.स. खांडेकरांचा हा चौदावा कथासंग्रह आहे. लघुकथा या साहित्यप्रकाराविषयी प्रसिद्ध पाश्चात्य कथाकार बेट्स याने एका ठिकाणी म्हटले आहे: "उत्तम आणि अधम यासंदर्भातील एखादे अप्रकट प्रवचन वाचकांपुढे करावे, एखादे तात्पर्य त्यांच्या मनांवर बिंबवावे, एखादा वेगळा दृष्टीकोन त्यांच्यापुढे ठेवावा किंवा एखाद्या तत्त्वज्ञानाचा शर्करावगुंठीत डोस त्यांना पाजावा, या हेतूने कधीही कथा लिहिल्या जाऊ नयेत. मानवी जीवनाबद्दलच्या उत्कट कौतूहलापोटी, आनंदसंवर्धनासाठी आणि त्या ज्या मनोवस्थेत लिहिल्या गेल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्या वाचल्या जायला हव्यात. असे सामर्थ्य जीमधे आहे, तीच उत्तम कथा!" या मानदंडाच्या आधारे सुजाण वाचकांना श्री. खांडेकरांच्या या कथासंग्रहातील कथांचा आस्वाद अधिक उत्कटपणे घेता येईल.
please login to review product
no review added