माणसाचे मन हे एखाद्या अथांग जलाशयासारखे, तळ्यासारखे आहे. वरून शांत दिसणा-या, निळेशार पाणी आणि कमळे यांनी भरलेल्या तळ्याच्या तळाशी काय काय असते ते फक्त तळेच जाणते. संंवेदनशील मनाचे हे भावविश्व, त्याची डूब ही त्याच्या खोलीवर अवलंबून असते. त्या भावविश्वाला वयाचे बंधन नाही, नाही गरिबी-श्रीमंतीचे. येणारा अनुभव, प्रसंग ह्यामुळे त्यावर उठणारे तरंग, कधी खूप मोठे तर कधी हळूच उमटणा-या लहरींसारखेही. पण वरून शांत दिसणा-या, सुंदर कमळांनी भरलेल्या त्या सुंदर जलाशयात कमळांच्या बिसतंतूंसारखी पार गुंतागुंत असते आणि मग उठणारे तरंग... ह्या अशाच तरंगांचे चित्रण ह्या कथांतून करण्याचा करण्याचा केलेला हा प्रयत्न......
please login to review product
no review added