माझे प्रेमळ मित्र डॉ. महेश खरात यांचे 'उत्तम वक्ता' हे पुस्तक वक्तृत्त्वाच्या वाटेवर प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. डॉ. महेश खरात आयुष्याच्या एका टप्प्यावर धडाडीचा वक्ता म्हणून नावारूपाला आले. आपल्याजवळील सामर्थ्य इतरांना वाटून धन्यता मिळवावी या उद्देशाने एका समर्थ सारस्वताने हे समर्थ मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.
आपल्याजवळ जे असते तेच आपण व्यक्त करतो. या साडेतीन हाताच्या • देहातून जे प्रगट होते ते व्यक्तित्व कसे असावे यावरही त्यांनी सुंदर भाष्य केले आहे. शब्दांची प्रभावी योजकता येण्यासाठी काय कष्ट करावेत, वैखरी संपन्न होण्यासाठीची शिकस्त कशी करावी याचे योग्य आणि नेमके मार्गदर्शन सरांनी केले आहे. यशस्वी वक्ता होण्यासाठी एका शहाणपणाची आवश्यकता असते. ते शहाणपण येण्यासाठी वक्तृत्त्वाच्या कलेच्या सर्वांगीण अभ्यासाची गरज आहे. वक्त्याकडे स्वतःचे विचार असावेत. सुलभ भाषेत श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःची शैली असावी. हे सर्व करण्यासाठी अखंड साधना असावी. परंतु ही साधना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य वाटाड्या असावा लागतो. त्या वाटाड्याचे काम हे पुस्तक करेल. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे
• वाट दावी त्याच्या । पुण्या नाही पार ।। होती उपकार अगणित ॥'
सर्व क्षेत्रामध्ये वैखरीचे वाटाडे निर्माण व्हावेत आणि त्यांनी बोधांचे अमृतघट घेऊन जगाचे चांगुलपण वाढवत जग सुंदर करावे यासाठी हे पुस्तक अत्यंत मौलिक काम करेलच करेल,
please login to review product
no review added