आमचा काय गुन्हा ?' या रेणू गावस्करांचा पुस्तकाचं वर्णन 'परीस स्पर्श' या शब्दातच करता येईल. हा परीस स्पर्श संस्थेच्या चार भिंतींचा आड दिवस कंठणाऱ्या मुलांच्या मनांना झाला आणि त्यांची जीवन उजळून गेली. संस्थांतील मुलांच्या संदर्भात किती महत्त्वाचं आहे हे! कोणे एके काळी मुलांवर Delinquent (उन्मार्गी) असा शिक्का कायद्याच्या परिभाषेत मारला गेला आणि आम्ही तो वारसा तसाच स्वीकारून पुढं चालू ठेवला. शेवटी मानवाधिकार आयोगाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्या मुलांच्या सहवासातील सुंदर क्षणांचं वर्णन म्हणजे हे पुस्तक.संस्थेच्या गजाआड राहणाऱ्या मुलांच्या अस्तित्वाच्या प्रश्नासारखी गंभीर समस्या हा या पुस्तकाचा गाभा ! पण तो गाभा हाताळताना कुठे कंटाळवाणेपणा नाही की अनावश्यक तात्विक चर्चा नाही. वाचकांच्या मनाला अंतर्मुख करण्याची शक्ती या सहजसुंदर लिखाणात आहे!'आप तो आ जाव' या मुलांच्या निमंत्रणातील आर्जवानं रेणू गावस्कर या गजाआडच्या मुलांपाशी गेल्या. त्यांचं पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मनात जिवंतपणाचा हा झरा निर्माण करील यात काहीच शंका नाही.
please login to review product
no review added