किशोर काळे यांचे गाजलेले आत्मकथन. आपल्यासारख्याच हाडामासांच्या माणसाला दुसरा माणूस दुय्यम ठरवून सर्वांत खालच्या पायरीवर आणून ठेवतो. त्याला हीन वागणूक देतो. याचं व्यवस्थेत राहून समाजाशी संघर्ष करून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हाट्याच्या पोराची ही कहाणी. हा पोर पिता कोण हे माहीत नाही, म्हणून आईचे नाव लावतो. त्याची आई नाचण्याच्या धंद्यातून बाहेर पडली, तरी आयुष्याची परवड काही थांबली नाही. हे पोर मात्र कुंटणखान्यात राहून शिक्षणाच्या गंगेत न्हाऊन निघते. डॉक्टर होते. अशा पोरांना बाहेर कोण काढणार, हा प्रश्नही वाचताना उभा राहतो.
please login to review product
no review added