नाव : जेम्स बाँड, उंची : १८३ सें. मी. वजन : ७६ किलोग्रॅम्स, सडसडीत बांधा, डोळे : निळे, केस : काळे, उजव्या गालावर आणि डाव्या खांद्यावर ओरखड्याचे वण, तालीमबाज, पिस्तुलबाजीमध्ये निष्णात, उत्तम मुष्टीयोद्धा, सुरे फेकण्यात तरबेज, वेषांतर करत नाहीे, फ्रेंच आणि जर्मन भाषा येतात, धूम्रपानाचं जबरदस्त व्यसन (तीन सोनेरी रिंगांच्या खास सिगरेटस् ओढतो), दुर्गुण : मद्यपान करतो पण अति मद्य घेत नाही, स्त्रियांचा मोह. जगामधल्या प्रत्येक मोठ्या देशातल्या गुप्तचरखात्यामध्ये ब्रिटिश सीव्रेÂट एजंट जेम्स बाँड याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मौजूद आहे. स्मर्श या रशियन गुप्तचर संघटनेनं जेम्स बाँडला लक्ष्य बनवलं : त्याचा वध करण्यासाठी. जेम्स बाँडला मोहिनी घालण्यासाठी त्यांनी तातिआना रोमानोवा या रूपसुंदर तरुणीची निवड केली. जेम्स बाँडला इंग्लंडहून इस्तंबूलपर्यंत खेचून आणणं आणि त्याला आपल्या मोहजालात अडकवणं हे तिचं काम होतं. पुढला सगळा पाताळयंत्री कट तिचे वरिष्ठ घडवून आणणार होते. स्मर्शनं लावलेल्या या सापळ्यात जेम्स बाँडनं आपण होऊन प्रवेश केला. या घातकी खेळामध्ये भुरळ पाडणारी तातिआना आणि रशियनांचं स्पेक्टर यंत्र ही दोन प्रमुख आमिषं होती. आणि - आणि या भयंकर खेळाचा शेवट अगदी निश्चित होता. तो म्हणजे जेम्स बाँडचा मृत्यु...! फ्रॉम रशिया विथ् लव्ह. डेली मेल, संडे टाइम्स या वृत्तपत्रांनी गौरवलेल्या इयान फ्लेमिंगच्या या जबरदस्त कादंबरीचा हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद.
please login to review product
no review added