आचार्य विनोबा भावे हे कवी म्हणून मोठे होते, कि तत्वज्ञानी म्हणून मोठे होते, समाजसेवक म्हणून मोठे होते कि प्रवचनकार म्हणून मोठे होते, देशभक्त म्हणून थोर होते कि मातृ-पितृ-गुरु-देवभक्त म्हणून थोर होते.... हा खरोखरच उत्तर देता न येण्यासारखा कुट प्रश्न आहे. जन्मत:च अतिशय प्रतिभासंपन्न म्हणून जन्माला आलेला हा मुलगा कोवळ्या वयात किती उंचावर जाऊन बसला! अगदी लहान वयापासून ते गीतेवर प्रवचनं देऊ शकतील इतके प्रज्ञावंत होते. एखाद्या योगी जीवासारखे आयुष्यभर साधक आणि सेवक म्हणूनच कार्यरत राहिले. जन्मभर ते गीताईच्या पदराला धरून, तिचा बालक होऊन निर्व्याजपणे वावरले. गीतेत सांगितल्याप्रमाणे अखंड मरणाचं स्मरण ठेऊन स्थितप्रज्ञपणे जगले आणि अंतकाळी त्यांनी आपल्या मनुष्यजन्माच कल्याण साधून घेतलं. त्याचं जगणं आणि मरण, दोन्ही सफल झालं.त्यामुळे शरीरच वस्त्र टाकून गेले तरी ते गीताईरुपी उरलेच. त्यांना जाऊन जवळपास ३४ वर्षे होत आली, तरीही ते त्यांच्या गीताईरुपान अमर होऊन गेलेले आहेत. आकाशातल्या ध्रुवताऱ्यासारखे अढळ आणि प्रकाशदर्शी!
please login to review product
no review added