‘फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा वाचकाचं लक्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’या कथेतून मिरासदार आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. तर ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मधून फेस्टिव्हलच्या फॅडवर त्यांनी भाष्य केलं आहे. आजची ढिसाळ कायदा-सुव्यवस्था आणि मंत्र्यांची ‘योग्यता’याचं मार्मिक चित्रण ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’या कथेतून केलं आहे. तर ‘एका शोकसभेचा वृत्तांत’या कथेतून त्यांनी माणसांचे विविध नमुने टिपले आहेत. या चारही विनोदी कथा श्रोत्यांना मनमुराद हसवतात आणि अंतर्मुखही करतात. राजकारण, समाजकारण, शिक्षण खातं, पोलिस खातं या क्षेत्रांतील व्यक्तींचं अत्यंत खुमासदार पद्धतीने केलेलं प्रातिनिधिक चित्रण त्या त्या खात्यातील विसंगतीवर बोट ठेवतंच; पण वाचकांना खळखळून हसायला लावतं. तेव्हा वाचकांना खळखळून हसवणारा हा कथासंग्रह सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे, असा आहे.
please login to review product
no review added