'रमाबाई रानडे' म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांच्या ज्या फक्त पत्नीच नव्हत्या तर ज्या त्यांच्या छाया होत्या, अशा एका महाराष्ट्रीय स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेलं पहिलेच असं आत्मचरित्र म्हणजेच 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' रमाबाई रानडे ह्यांचे व्यक्तिमत्व किती प्रभावी होते ते हे आत्मचरित्र वाचताना लक्षात येते. वेळोवेळी घडलेल्या गोष्टी व झालेली संभाषणे काही सहज तर, काही विशेष कारणांनी ध्यानात राहिली ती आठवली तशी सध्याचे स्थितीत अंत:करणाचे सांत्वन करण्यासाठी व जो श्रेष्ठतम सहवास जो आता प्रत्यक्ष राहिला नाही; त्याचा मानसिक रीतीने अनुभव घेण्यासाठी वहिनीबाईंनी कागदावर मांडली व आता ती वाचकांस सादर केली आहेत.अनुपमेय भक्ती व निस्सीम प्रेम या भावांनी या 'आठवणी' लिहिल्या आहेत.
please login to review product
no review added