जयवंत दळवींनी धीटपणे न्याहाळलेली मानवी दु:खाची नाना रुपं हे ’रुक्मिणी’ चं खरं वैभव आहे. सुदैवाने, सुखानं, सौंदर्यानं, कर्तुत्वानं ज्यांना हुलकावणी दिली आहे. अशा पिचलेल्या मनाचं आक्रंदन द्ळवींनी या संग्रहात सहज अशा सामर्थ्यानं घडवलं आहे. प्रवृत्ती आणि नियती यांच्या विपरीतपणामुळं पिळवटून गेलेल्या माणसांचे आणि भडक नाटकीपणा यांच्या आहारी न जाता दळवींच्या स्वच्छ, प्रवाही, नितळ शैलीने लीलया उमटवले आहेत. मराठी कथेच्या प्रांतात कही वेगळे सूर भरणारा हा कथासंग्रह आहे.
please login to review product
no review added