लग्नापूर्वीच्या इंदू घुले. परंपरा जपणार्या, व्रत वैकल्य सांभाळणार्या घुलेशास्त्री घराणातल्या इंदूने सेवाव्रत स्वीकारलेल्या, जटा-दाढी वाढवलेल्या ब्रम्हचार्याच्या वेशातल्या मुरलीधर म्हणजेच बाबा आमटे यांना जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. जिथे मुलींना चाकोरीबाहेरच्या जिण्याचीसुध्दा भीती वाटते तिथे साधनाताईंनी चाकोरीबाहेरच्या जगातच आपल्या संसाराची चूल मांडली. आनंदवन जेव्हा ओसाड जंगल होते तेव्हा साधनाताई बाबांसोबत तेथे राहिल्या, आनंदवन खर्या अर्थाने ‘आनंदवन’ म्हणून फुलवण्यात त्यांनी बाबांना मोलाची साथ दिली. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे आनंदवन, सोमनाथचा शेतकी प्रकल्प, हेमलकसा येथे आदिवासींचे आरोग्य आणि शिक्षणासाठी केलेले कार्य या सर्वांमध्ये साधनाताईंनी स्वत:ला झोकून दिले. बाबा आमटेंना इतके व्यापक कार्य करणे शक्य झाले ते साधनाताईंच्या भक्कम पाठिंब्यामुळेच.
please login to review product
no review added