अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्र्ययुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे 'साने गुरुजी !' मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, एकता निर्माण व्हावी, शेतकरी कामकरी वर्गाचे दैन्य- दारिद्र्य दूर व्हावे व सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले. लहान मुले, स्त्रिया, तरुण, दीन-दलित यांना स्वत्त्वाची जाणीव व्हावी व उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम असे साहित्य त्यांनी निर्माण केले.आज साने गुरुजींसारखे उदात्त व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये नसले तरीही त्यांचा हा साहित्यरूपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे. अत्यंत सोप्या भाषेतील या बोधप्रद कथा, वैचारिक लेख, इतर भाषांमधील महान लेखकांचे अनुवादित साहित्य घरोघरी पोहोचावे या हेतूने साने गुरुजींची सर्व पुस्तके एकूण ५१ खंडामध्ये आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक घर गुरुजींच्या विचारांनी पावन व्हावे, हीच एकमेव इच्छा.
please login to review product
no review added