आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पेटून उठलेल्या हिंमतवान भारतीय सैनिकांच्या या कथा आहेत. त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडूनही तसेच प्रोत्साहन मिळाले. युद्ध ही जरी राष्ट्राने हाती घेतलेल्या राजनीतीची पुढील पायरी असली तरी, रणधुमाळीत तोलले जाते ते सैनिकांचे नशीब! भारतीय सैनिक, ज्यांच्या गळी ‘स्वत:आधी सेवा’ हे तत्त्व पूर्णपणे उतरलेले असते, युद्धातील सर्व आव्हाने अंगावर घेतात, प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग शोधतात आणि अशक्यप्राय वाटणारे यश हसतमुखाने खेचून आणतात. फार थोड्यांचे शौर्य पदकाने सन्मानित होते. बाकीच्यांची दखल घेतली जाणे गरजेचे आहे. हे सर्व योद्धे, जे असे निर्भीड होते, ते कशामुळे झाले? त्यांना कोणी घडविले? भारतीय सैनिकांचे कर्तृत्व, त्यांची ध्येयधारणा, त्यांनी भारतीय सैन्याची आणि आपल्या देशाची केलेली सेवा वाचकांपर्यंत पोहोचवायचे काम या पुस्तकाने केले आहे. ज्या भारतभूमीसाठी या जवानांनी आपले रक्त सांडले, त्या भारताचे सर्वार्थाने रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. या शूर योद्ध्यांना तीच खरी श्रद्धांजली आहे.
please login to review product
no review added