• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Derda (देर्दा)

  Popular Prakashan

 286

 978-81-7185-493-6

 ₹375

 Paper Back

 300 Gm

 2

 2


सुप्रसिद्ध तुर्की लेखक हकन गुंदे यांच्या या कादंबरीमध्ये देर्दा नावाच्या दोन व्यक्तिरेखा आहेत. दोन वेगवेगळ्या प्रतालांवर जगणारे दोन देर्दा,समवयस्कर आणि भिन्नलिंगीय-एक स्त्री आणि एक पुरुष. एक देर्दा, जो कब्रस्थानात, कबरी धुण्याचे काम करत लहानाचा मोठा होत असताना एका क्रांतिकारी तुर्की साहित्यिकाच्या कबरीवर कोरलेली काही अक्षरे,त्याला जगण्याकरिता प्रेरणा पुरवत आहेत. आणि मग तो स्वतः ही पुस्तकांच्या सहवासात ओढला जातो. पुस्तकाचे हे जग पायरेटेड प्रती छापून त्यांच्या एक समांतर साहित्यिक व्यवहार जोपासणारे. तिथून मग तो गुन्हेगारी, तुरुंगवासाच्या मार्गाने वाहत जातो तिथे त्याला जाणीव होते त्या दुसऱ्या देर्दाची , जी इस्तंबूलच्या परीघावरच्या एका खेड्यामध्ये, युद्धात उध्वस्त झालेल्या परिसरात अनाथ जगात असताना अल्पवयात निकाहनामा होऊन लंडनला जाते आणि तिथे पुढची दहा वर्षे नजरकैदेत जगते. एक बंद खोली हेच तिचे आयुष्य.समांतर जगणाऱ्या या दोन देर्दांची विश्वे एकमेकांना छेदून जाई पर्यंतचा प्रवास आणि नंतरचे त्यांचे एकत्रित आयुष्य जितके वास्तव तितकाच त्यांचा हा प्रवास अदभूत आणि क्रूर, मानवतेच्या मुलभूत भावनांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणारा. तुर्की भाषेतली अ झ ही दोन अक्षरे एकत्रितपणेच उच्चारावी लागतात. या दोन अक्षरांमधील अनेक अक्षरे, अनेक अर्थांच्या छटा ओलांडून एकमेकांपर्यंत पोहोचावे लागते. दोन्ही देर्दांची आयुष्येही या अक्षरांसारखीच या अक्षरांमुळेच एकमेकांजवळ आलेली. एकमेकांपासून पूर्ण वेगळी, काहीच समांतर नाही. दोन वेगळ्या संस्कृती, त्यांचे एकमेकांकडे बघण्याचे पूर्ण भिन्न, एकमेकांना अजिबात समजून घेऊ न शकणारे दृष्टीकोन,पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीमधला बदल हा भाषिक फरकाहून किती खोलवर रुजलेला आहे आणि खरी गरज आहे ती सांस्कृतिक अनुवादांची हे पुन्हा ह्या कादंबरीच्या निमित्ताने जाणवते.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update