बालपणापासून समर्थ गीतकार म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या माडगूळकरांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा मागोवा या कादंबरीमध्ये घेण्याचा मी माझ्या ताकदीनुसार प्रयत्न केला आहे. त्यांच्या अनेक चित्रपटगीतांतून जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि विशाहीनाला योग्य दिशा दाखविण्याचा प्रयत्न आढळतो. 'गीतरामायण' तर मानवी जीवनाच्या कडू-गोड आठवणींनी भरलेले एक ज्ञानभांडारच आहे. ज्ञानाचे हे कण आपल्या उण्यापुन्या आयुष्याच्या वाटचालीत एखाद्या मधमाशीने फुलाफुलातील मधुरस सातत्याने आपल्या मधुकोशात साठवून ठेवावा त्याप्रमाणे अण्णांनी आपल्या ईशस्पर्श प्रतिभेमध्ये साठवून ठेवले असावेत आणि विविध गीतांच्या अलंकारांनी नटवून कुबेराने रत्नभांडार उधळावं त्याप्रमाणे आपल्या विविध गीतांमधून रसिकांच्या समोर उधळले असावेत.
please login to review product
no review added