पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते?मधमाशामकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात,ज्यातून हजारो वर्ष टिकू शकणारा मध तयार होतो?कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात?माणसाला अजूनही न जमलेलं सेलुलोजचं विघटन बुरशी कसं क्रते?आश्र्चर्यंच आश्र्चर्य!आपल्या शरीराचंही तेच.मेंदूपासून हृदयापर्यंत्च्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात,हे एक कोडंच.या आणि अशा प्रश्र्नांची कोडी अनिल अवचट यांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे.तज्ञ गाठले,पुस्तकं पालथी तली आणि ही कोडी सहज सोप्या भाषेत उलगडून आपल्या समोर ठेवली.
please login to review product
no review added