विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शेतकरी चळवळीने इतिहास घडविला. शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने चाललेल्या या चळवळीने २००५ साली आपला रौप्य महोत्सव साजरा केला. 'योद्धा शेतकरी' या विजय परुळकरांच्या पुस्तकानंतर अरविंद वामन कुलकर्णी यांचे लिखाण, सुरेशचंद्र म्हात्रे यांनी संपादित केलेली शरद जोशी यांची पुस्तके विनय हर्डीकर, अमर हबीब यांचे स्फुट लिखाण असे मोजकेच साहित्य या महत्वाच्या चळवळीवर उपलब्ध आहे. अनंत उमरीकरांनी या पुस्तकाद्वारे शेतकरी चळवळीचा इतिहास ललित भाषेत मांडून महत्वाचे काम केले आहे.
please login to review product
no review added