विसाव्या शतकातील भारतीय कला जगताच्या क्षितिजावरील काही कला व्यक्तिमत्वे व त्यांनी जोपासलेल्या कला परंपरेची ओळख म्हणजे ‘सृजनगंध’. या महान कलावंतांनी भारतीय कला जीवनात आपल्या कलाविष्कारांनी एक ठसा उमटविला, आपली शैली जोपासली ! त्यांच्या वास्तववादी सकारात्मक कामाने अनेक भावी कलाकारांना ते प्रेरणादायक ठरले. पण आपल्याकडे या कलावंतांच्या कार्यांचे दस्ताविजीकरण व्हावे तसे झाले नाही. पुढील पिढ्यांना या कलावंतांच्या जीवनपटातील रंग उलगडून दाखवावेत, हाच या पुस्तकाचा हेतू आहे.
कलाक्षेत्रातील या उतुंग व्यक्तिमत्वांच्या कुंचल्यातील रंग कलारसिकांच्या जीवनात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलवतील यात शंकाच नाही.
please login to review product
no review added