इ. स. १८७० ते ८० च्या दरम्यानची हकिगत आशिया मायनरमधल्या एका गूढ अशा टेकडीच्या आसपास एक वयस्क गृहस्थ वारंवार दिसत असे. रुपेरी केस, डोळे, उंच कॉलरचा कोट आणि उन्हापासून रक्षण व्हावं म्हणून डोक्यावर हॅट. मित्रत्वानं विचारपूस करणा-याला तो सांगत असे की, त्यानं प्राचीन ट्रॉय शहराचा शोध लावला असून तिथल्या प्रचंड भिंतींमधून त्याला सोन्याचा गुप्त खजिना सापडला होता. अथेन्समधल्या त्याच्या घरात म्हणे तो खजिना सुरक्षित ठेवलेला होता. ट्रोजन साम्राज्यातील राजमुकुटांचे मौल्यवान हिरे सुवर्णाचे मुखवटे आणि ग्रीक सम्राटांच्या अशाच असंख्य वस्तू त्याच्या ताब्यात होत्या. निम्मं आयुष्य जाईपर्यंत त्यानं कुदळीला हातसुद्धा लावला नव्हता; पण गेली सतरा वर्षे तो उत्खननात सदैव गुंतला होता, अशी माहिती तो देई. उत्खननाबद्दल प्राथमिक ज्ञानही नसलेल्या या माणसानं आधुनिक पुरातत्वाचा शास्त्रीय पाया घातला. काही माणसांना जमिनीखाली पाणी कोठे असतील हे जणू अतींद्रिय शक्तीनं कळायचं, त्याची ही चरितकहाणी ’सुवर्णयोगी’.
please login to review product
no review added