‘प्रार्थनेची घंटा’ हा अशोक कोतवाल यांचा समर्थ ललितलेख संग्रह. कोतवालांच्या लेखणीला निबंध, कथा, भावकथा, गूढता, अंतर्मुख करणारे विचार यांचं बळ किती सहज आत्मसात झालं आहे, हे ह्या लेखांतून अधिक स्पष्ट होते. अशोक कोतवाल हे खरं तर कवी. ह्या सर्व लेखांतून त्यांच्यातील कवी, लेखक, चिंतक प्रगट होतो. माणसांविषयी जाणून घेण्याचं कुतूहल कोतवालांना आहे; तसेच जीवनसौंदर्य दृष्टीचा शोधही आहे. अतिशय भावस्पर्शी, नैसर्गिक शैलीतील हे ललित लेख वाचकांना प्रसन्न साहित्यानुभव देणारे आहेत.
please login to review product
no review added