दक्षिण अमेरिका. नेहमीच्या प्रवासापासून दूर राहिलेलं एक खंड. त्याच्या जवळ जाण्याची आपलीच काय, युरोपियनांची वा भटक्या जपान्यांचीही फारशी इच्छा नसते. तरी अमेरिकेच्या शोधापासून बाकीच्या जगावर तिनं एक मायाजाल टाकलेलं आहे. उत्तर अमेरिकेबद्दलचं हे दडपण लवकर उठलं, सहज मिळणार्याी सोन्याच्या भुलीनं युरोप लगेच तिकडं धावला. या दक्षिणेत मात्र स्पॅनिश आणि पोर्तुगीजांशिवाय कित्येक शतकं कुणाला शिरकाव नव्हता. त्या काळात निर्माण झालेला दुरावा अजूनही शिल्लक आहे. चटकन कुणी तिकडं वळत नाही. तिथं उमटलेली ही मराठी पावलं
please login to review product
no review added