बिराड’ हे अशोक पवार यांचं आत्मकथन. वाचकाला पानोपानी अस्वस्थ आणि सुन्न करणारं हे ‘बेलदार’ जमातीचं चित्रविचित्र जीवन आहे. पशुतुल्य जीवन जगणार्या माणसाची होरपळ वाचताना कोणताही वाचक हादरून जाईल, गोंधळून जाईल असे हे अनुभव आहेत. साहित्यात प्रथमच इतकं भयानक, भीषण आणि भयावह दु:ख व्यक्त झालं असेल! ‘बिराड’ वाचणं हा एक अतिशय वेगळा अनुभव आहे, तितकाच अंतर्मुख करणाराही. माणसाला अत्यंत तीव्रतेने माणूसपणाची जाणीव करून देणाराही. विषम व्यवस्थेच्या अमानुष क्रौर्याचं लक्षण म्हणजे हे पुस्तक. भीक आणि भूक, दारिद्य्र आणि गुन्हेगारी या विळख्यात चिरडलेल्या ज्वलंत दु:खाची ही गाथा.
please login to review product
no review added