सूक्ष्म निरीक्षणांमधून आकळलेल्या मानवी व्यवहारांच्या तपशीलवार वास्तववादी चित्रणामुळे महादेव मोरे यांचा व्यक्तिचित्रणांचा हा संग्रह मराठी साहित्यात महत्त्वाचा ठरतो. जागोजागी आढळणारी बेळगावनिपाणी या महाराष्ट्राच्या सीमाभागातली वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा, हेही या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या निमित्ताने मराठी वाचकांना या बोलीतल्या काही शब्दांचा परिचय होईल. यात भेटणारी माणसं ही विविध जातीजमातींची आहेत. ती गरीब, भोळीभाबडी आहेत, तशीच इरसालही आहेत; परिस्थितीने गांजलेली, पिचलेली, निराश झालेली आहेत, तशीच स्वप्नं पाहणारी, आशेच्या एका तंतूमागे धावणारीही आहेत, लेखकाच्या जीवनातले कडूगोड प्रसंगही आहेत. मुख्य धारेतल्या मराठी साहित्याच्या परिघाबाहेरची ही माणसं कधी हसवतात; रडवतात, अचंबित करतात, मनात करुणभाव उत्पन्न करतात; तर कधी जीवनाबद्दलची अनोखी अंतर्दृष्टी देऊन जातात.
please login to review product
no review added