शिरीष कणेकर म्हणजे वाचनीयता. भिन्न वयोगटातील वाचकांना आपल्याबरोबर खेचत घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या ओघवती लेखणीत आहे. अचूक शब्दयोजना, सहजसुंदर भाषा, प्रसन्न लाघव, विचारांची सुस्पष्टता, खोडकर नजर, दिलखुलास निवेदनशैली, भावुकता व समोर बसून गप्पा मारल्यागत सुसंवाद साधणारा बाज ही कणेकरांच्या सदाबहार लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कलमगिरी ‘कणेकरी’ शैली म्हणून आज मराठी वाचकात ओळखली जाते. या अफलातून ‘कणेकरी’ शैलीचा हा नूतन नजराणा !
please login to review product
no review added